Family Tree
Jaikumar Chawre Shantikumar Killedar

सर्वांना सादर जय जिनेन्द्र

स्व. श्री जयकुमारजी देविदासजी चवरे व स्व.श्री जम्बुदाससावजी देविदासजी चवरे यांचे प्रेरणेने स्वर्गीय श्री शांतीकुमारजी किल्लेदार काकांनी 2006 मध्ये दक्षिण प्रांतिय दिगंबर जैन बघेरवाळ समाजाची वंशावळी पुस्तिका तयार केली होती.

त्यानंतर समाजामध्ये नव्याने जन्म झालेल्या मुलांची नोंद, झालेल्या विवाहाच्या जोडीदाराची नोंद घेऊन व असलेल्या त्रुटीची दुरुस्ती करून ही वंशावळ पुस्तिका पुन्हा 2019 मध्ये मी, अविनाश आग्रेकर यांनी तयार केली होती. ही पुस्तिका समाज घटकाच्या प्रत्येक घरी देण्यात आली होती.

यामध्ये मुलींची नावे व बघेरवाळ व्यतिरिक्त सदस्यांसोबत विवाह झालेल्या भगिनींची नोंद नव्हती, शिवाय काही त्रुटी पण राहिल्या असतील.

आता सात वर्षानंतर समाजामध्ये बराच बदल झालेला आहे जसे नव्याने विवाह झाले आहेत, काही मुला मुलींचे जन्म झालेले आहेत अशा सगळ्यांची माहिती असावी या दृष्टिकोनातून या वंशावळीचे अपडेशन चे काम सुरू होते.

बघेरवाळ समाजाच्या लेकी व जावई याची स्वतंत्र नोंद असलेली माहिती श्री रमेशभाऊ मिश्रीकोटकर नागपूर, यांच्याकडून प्राप्त झाली. श्री नितीन भाऊ खेडकर मुंबई, यांनाही वंशावळ व नातेसंबंधची माहिती करून घेण्याची विशेष आवड आहे व ते सतत यावर काम करत असतात. या माहितीच्या आधारे कुटुंबवृक्ष तयार व्हावा ही संकल्पना त्यांनी मांडली.

प्रत्येक सदस्याला एक नंबर दिला, त्यानंतरच्या कॉलम मध्ये त्या सदस्याच्या वडीलाचा, आईचा, पती किंवा पत्नीचा नंबर देण्यात आला व ते एकमेकांसोबत लिंक करण्यात आले. त्यामुळे त्या सदस्याचे वडील, आई, पती-पत्नी याची माहिती आपोआप तयार होत गेली.

पूर्वीच्या काही सदस्यांना दोन किंवा तीन पत्नी असल्याचेही आढळून येते मग त्यांचे अपत्य हे कोणत्या आईचे याची माहिती असल्याशिवाय त्यांचे मामकुळ कळणार नव्हते. त्यामुळे त्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत संपर्क साधून प्रथम ही माहिती मिळविली. ही सर्व माहिती मिळविण्याचे व दुरुस्तीचे काम गेल्या पाच सहा महिन्यापासून सुरू होते. यासाठी बऱ्याच सदस्यांना फोन द्वारे संपर्क साधला, कारंजा, नागपूर, जालना, जिंतूर या ठिकाणी भेट देऊन काही सदस्यांसोबत बसून या माहितीतील त्रुटी किंवा अपूर्ण असलेली माहिती अचूक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला.

अशा प्रकारे तयार झालेली माहिती, एचटीएमएल प्रोग्रामिंग चा वापर करून ती लिंक जुळविण्यात आली व एक वेबसाईट bagherwal.com तयार करण्यात आली.

हे वेब पेज उघडल्यानंतर आपल्याला आडनाव सिलेक्ट करावयाचे आहे त्या आडनावाचे सर्व सदस्य आपल्याला बाजूच्या कॉलम मध्ये ड्रॉप डाऊन मध्ये दिसेल त्यातील कोणत्याही एका सदस्याचे नाव आपण सिलेक्ट केल्यास त्याचे वडील, त्याची आई, त्याची पती किंवा पत्नी आणि त्याचे मुलं किंवा मुली हे आपल्याला दिसू शकतील. वडिलांच्या नावावर किंवा आईच्या नावावर क्लिक केल्यास त्यांची मुले मुली आपल्याला दिसू शकतील. असे मागे जात गेल्यास पाच-सहा पिढींची माहिती व नातेवाईक संबंध कळू शकतात. म्हणजे एखाद्या सदस्यांचा कुटुंब वृक्ष दिसतो. हे मराठी व इंग्लिश मध्ये सुद्धा दिसेल.

ही दक्षिण प्रांतीय बघेरवाळ समाजाची vanshaval/ कुटुंब पिढीची माहिती असल्यामुळे इतरांना बघेरवाळ व्यतिरिक्त / नॉन बघेरवाळ संबोधण्यात आले आहे (kota- मालदा येथील सदस्यांना सुद्धा ) त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहोत.

चुकीच्या किंवा अपुऱ्या माहिती मुळे किंवा टायपिंग चुकीमुळे काही त्रुटी असतील त्याबद्दल सुद्धा क्षमाप्रार्थी आहोत. त्रुटी /चुका लक्षात आणून दिल्यास दुरुस्ती करणे शक्य आहे.

धन्यवाद

अविनाश र.आग्रेकर

नितीन रु.खेडकर